मला अजूनही पेण मध्ये अचानक मामा भेटायला आले होते ते आठवत. एका प्रशस्त अशा गाडीमध्ये आम्हा सर्वांना घेऊन पालीच्या मंदिराला नेहले. बाबांच्या शिस्ती मध्ये वाढलेलो असल्यामुळे असा अचानक कुठेही जाण, मला नवलच. खोदून खोदून विचारल तेव्हा मामा मिस्किल पणे हसून बोलले की अरे आज माझा वाढदिवस आहे. लहान असल्यामुळे, खरंच त्यांचा वाढदिवस होता की नाही हे ठाऊक नाही, पण त्याच्या वाढदिवस सारखा यावा हे माझ्या बाल मनाला वाटले. वेळ काळ बदला पण त्याचं ते ह्यास मझ्या मनात राहिले.
अशा अनेक सुवर्ण आठवणींने आमचं बालपण मामांनी बहरून सोडलेलं आहे.
बाबांना सुद्धा कधी जरा बसत जावा अशी चेष्टा करणारे मामा, बाबा गेल्यावर अक्षरश: ढग फुटल्यासारखे रडले.
सर्व नातवांना भुरळ घालणारे आजोबा आणि घरातल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे ( शक्य तेवढ्या प्रेमाने पण गरज पडली तर तितक्याच हक्काने “छडी लागे छम छम या” मार्गाने) आमचे मामा.
त्यांचा असा हा अविरत प्रवास नीरा ते मुंबई, मुंबई ते अमेरिका. आयुष्याचे ऐश्वर्य हे नोटांमध्ये न मोजता, लोकांच्या समाधानात त्यांनी शोधलं. कित्येकांचे आयुष्य त्यांनी उभं केलं. शासनातले उत्तुंग दर्जाचा अधिकारी, एक आदर्श भाऊ, पती, वडिल, काका मामा; मित्र पण आई-वडिलांच्या आठवणीनं त्यांचे डोळे पाणावलेले पाहिले की उगाच आपल्या काळजाला चिमटा लागून जातो.
पुतण्यांमध्ये, भाच्यांमध्ये मित्रासारखा वावरणारे, गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणारे, सर्व सूनां साठी वडीलांसारखे, आश्या अनेक आयुष्यातल्या विविध पैलूंना सहज रीत्या हाताळणार हे व्यक्तिमत्व. अगदी हिऱ्या सारखं, प्रत्येक पैलू लक्ख चमकदार. ही चमक यायला कष्ट ही तेवढेच घेतले होते. आई वडिलांची पुण्याई कधी ही न विसरता, अविरत लोकांच्या भल्यासाठी झटणारे आमचे मामा.
त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ( आणि यात काही शंकाच नाही कारण आमच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला तुम्ही येणार आहात )